MKCL Olympiad Movement (MOM)
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. ५वी ते ९वी तील SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘MKCL ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा नोव्हेंबर २०२१ अर्थात ‘MOM’ ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेतील प्रश्नप्रकार आणि प्रश्नांचे स्वरूप हे जागतिक पातळीवरील मानकांनुसार तयार केले गेले आहेत. या स्पर्धा परीक्षेतील विजयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर काही लाखांची परितोषिकेही दिले जाणार आहेत.