विनामुल्य ! मोफत !! सुवर्णसंधी !!!
१२ वी त शिकणाऱ्या/उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
‘पदवी सोबत कमाईची संधी ’- विशेष सेमिनार
१२वी नंतर स्वत:च्या पायावर उभे राहून उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठीशिक्षण, अनुभव आणि अर्निंग एकाच वेळेस उपलब्ध करून देणा-या या प्रकल्पाविषयी व करिअरच्या नव्या संधींविषयी विद्यार्थी व पालक यांना माहिती देण्यासाठी MKCL औरंगाबाद तर्फे विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले. आहे. सदर सेमिनार मध्ये MKCL पुणे येथील डॉ. दीपक पाटेकर, औरंगाबाद चे श्री. सिद्धार्थ पाटील हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे सेमिनार चार ठिकाणी होणार असून त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
दिनांक | वेळ | स्थळ |
21 मे, 2022 | सकाळी 10:00 | हॉटेल विराज गार्डन, औरंगाबाद रोड, गंगापूर |
21 मे, 2022 | दुपारी 01:00 | यश अकॅडमी, निवारा नगर, लाडगाव रोड, वैजापूर |
23 मे, 2022 | सकाळी 09:30 | जैन कॉम्प्लेक्स, पिशोर नाका, ग्रामीण पोलिस स्टेशन समोर, कन्नड |
23 मे, 2022 | दुपारी 01:00 | सिल्लोड. |
१२ वी उत्तीर्ण होणाऱ्या, विशेषत: कला व वाणिज्य शाखेतल्या गरजू विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्रात तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कमाईतून पदवीची नवी संधी उपलब्ध करून देणारे अभिनव शिक्षणक्रम MKCL तर्फे गेल्या १० वर्षांपासून राबविले जातात. त्याअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indira Gandhi National Open University – IGNOU) आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU) या विद्यापीठांच्या सहयोगाने MKCL तर्फे १२वी च्या विद्याथ्यांसाठी वर्क-बेस्ड पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची व डिग्री शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देणारा हा अभिनव अभ्यासक्रम आहे- “Bachelor of Business Administration (Services Management)- BBA (SM)”. यासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) आणि MKCL मध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे.
(ग्राहक सेवा, BPO, KPO, Business Process Management (BPM), या सतत विस्तारणा-या क्षेत्रात, अर्थपूर्ण आणि प्रगतीशील करियर करण्याची इच्छा असणाऱ्या युवक आणि युवतींसाठी बारावीनंतर हा पदवी शिक्षणक्रम आहे.) Bachelor of Business Administration: BBA (SM) याअंतर्गत विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते व कंपनीकडून त्यांच्या नियमांनुसार दरमहा स्टायपेंडही (कमाई) मिळतो. विद्यार्थ्यांचे ऑफिस हेच त्यांचे कॉलेज असते.